परतावा व रद्द करण्याचं धोरण
शेवटचा बदल: 17 सप्टेंबर 2026
आमचं वचन सोपं आहे — तुमची काहीच चूक नसताना ई-बुक मिळालं नाही, तर पैसे १००% परत. कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.
१. ई-बुक्स (डिजिटल PDF)
ई-बुक ही डिजिटल वस्तू आहे — डाउनलोड झाल्यानंतर ती परत करता येत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे परतावा दिला जात नाही. पण खालील परिस्थितीत पूर्ण परतावा मिळेल:
- डाउनलोड लिंक मिळाली नाही आणि २४ तासांत सोडवता आली नाही.
- फाइल उघडत नाही किंवा खराब आहे आणि बदलून देता आली नाही.
- चुकून एकच पुस्तक दोन वेळा विकत घेतलं — दुसऱ्या व्यवहाराची रक्कम परत.
- वर्णनात सांगितलेल्यापेक्षा पूर्णपणे वेगळं पुस्तक मिळालं.
खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक पुस्तकाची पानसंख्या, प्रकरणं आणि विषय वेबसाइटवर स्पष्ट लिहिलेले आहेत. शंका असेल तर खरेदीपूर्वी ईमेलवर विचारा — नमुना पानं पाठवली जातील.
२. परतावा कसा मागायचा?
- contact@mrspriyainfo.in वर ईमेल करा.
- सोबत हे कळवा — SuperProfile चा ऑर्डर/व्यवहार क्रमांक, तारीख, रक्कम आणि कारण.
- विनंती २४ तासांत तपासली जाते आणि उत्तर दिलं जातं.
- मंजूर झाल्यावर परतावा ५ ते ७ कामकाजाच्या दिवसांत ज्या पद्धतीने पैसे भरले, त्याच पद्धतीने परत जमा होतो (हा वेळ बँकेच्या हातात असतो).
३. वाद असल्यास
परताव्याबाबत समाधान न झाल्यास कृपया आधी आम्हाला ईमेल करा — बहुतेक गोष्टी बोलून सुटतात. तरीही न सुटल्यास SuperProfile च्या मदत-विभागाचा किंवा योग्य ग्राहक मंचाचा वापर करता येईल.
काही शंका असेल तर contact@mrspriyainfo.in वर कळवा, किंवा SuperProfile पान पाहा.